सातारा : अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी कारचालका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 5 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कुदरत सलीम बागवान रा. बुधवार पेठ, सातारा हे त्यांच्या पत्नी आणि दोन मुलींसह करंजे कमानीतून मोळाचा ओढा -एसटी स्टँडच्या रस्त्याला दुचाकीवरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार क्र. एमएच 11 बीव्ही 5172 वरील चालकाने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. या अपघातात बागवान हे जखमी झाले. या अपघात प्रकरणी कारचालका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार भोसले करीत आहेत.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
