सातारा : सातारा शहरातील सदरबाझार, लक्ष्मी टेकडी येथे राहत्या घरी एका व्यक्तीने लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना दि. २९ रोजी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येला कारणीभूत ठरल्याच्या संशयावरून सहा जणांविरोधात अॅट्रॉसिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा शहर पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक व सामाजिक तणावातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती असून याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार सुतार करत आहेत.