...अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल

शांतता समितीच्या बैठकीत पोलिसांचा इशारा

by Team Satara Today | published on : 18 August 2025


सातारा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथे शांतता समितीची बैठक झाली. यावेळी नियमांचे पालन करावे. अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असे पोलिसांनी सांगितले.

येथील अलंकार हॉलमध्ये पोलिसांनी शांतता समितीची बैठक घेतली. पोलीस उपअधीक्षक राजीव नवले, सातारा शहर, शाहूपुरी, तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तसेच सातारा गणेशोत्सव समन्वय समितीचे सद्स्य, शांतता समितीचे सदस्य, मंडळांचे कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

समितीतील डॉ. अंजली कुलकर्णी यांनी डॉल्बी, डीजे सिस्टिमला विरोध करत, त्याचे दुष्परिणाम मांडले. समन्वय समितीने आगमन मिरवणुकांचा कालावधी कमी केला असून, नियमांचे पालन केले जाईल, असे सांगितले.

ज्येष्ठ नागरिक, व्याधीग्रस्त, गर्भवती महिला, लहान मुलांच्या समस्यांकडे लक्ष द्या, त्यांना त्रास होवू देवू नका. कायद्याचे पालन करुनच गणेशोत्सव साजरा करावा. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित मंडळांवर गुन्हे दाखल केले जातील, असे पोलिसांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा पालिका सभागृहात लागले प्रभागनिहाय रचनेचे नकाशे
पुढील बातमी
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर

संबंधित बातम्या