सातारा : सातारा एमआयडीसी परिसरात शनिवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास दुचाकीला दुचाकीने पाठीमागून धडक दिली. या अपघात शिवांश अमर चव्हाण (वय 3, रा. कारंडवाडी, मुळ रा. वर्णे, ता. सातारा) यांचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अमर चव्हाण हे पत्नी व शिवांश यांना घेउन गोव्याला फिरायला जाणार होते. याचे तिकिट बुक करण्यासाठी शनिवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ते कुंटुंबासोबत दुचाकीवरुन बॉम्बे रेस्टॉरंट च्या दिशेने जात असताना एमआयडीसीत परिसरात त्या दुचाकीला विनोद विधाते (वय 42, रा. कारंडवाडी ता. सातारा) याने पाठीमागून धडक दिली. या अपघातात तिघेही रस्त्यावर पडल्याने जखमी झाले. शिवांश यांच्या डोक्याला मार लागून कानातून रक्त येउ लागले. परिसरातील लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. परंतु शिवांश यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
याप्रकरणी अमर चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरुन विनोद विधाते यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी विनोदने दारुचे सेवन करुन दुचाकी चालवत होता का हे पाहण्यासाठी नमुने घेतले असून पुढील तपास पोलीस हवालदार कारळे करत आहेत.