सातारा : मसूर येथे युवतीने बेडरूम मध्ये ओढणीच्या साह्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्याचे कारण मात्र समजू शकले नाही.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कार्तिकी धर्मेंद्र कदम वय 51 राहणार मसूर तालुका कराड यांनी या प्रकरणाची खबर मसूर पोलीस स्टेशनला दिली आहे. दिनांक 30 जुलै रात्री 10 ते दिनांक 31 जुलै सकाळी पावणे सात या दरम्यान तेजस्विनी काशीद या युवतीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे खबरी जबाबात नमूद आहे. सहाय्यक फौजदार ए एम खरात अधिक तपास करत आहे