सातारा : झोपेच्या गोळ्या खाल्ल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी संतोष मानसिंग भोसले रा. करंजे पेठ, सातारा यांनी राहत्या घरी झोपेच्या गोळ्या खाल्ल्याने त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास महिला पोलीस नाईक बोराटे करीत आहेत.