फलटण : महाराष्ट्राच्या भूमीला संतांच्या विचारांचा वारसा आहे. जिल्ह्याला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण अशा विभूतींच्या विचारांचा वारसा आहे. तोच वारसा पुढे घेऊन वाटचाल करणाऱ्या शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याच पाठीशी फलटण तालुक्यातील जनता व जिल्हा ठामपणे राहील, असा विश्वास ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांनी व्यक्त केला.
येथे राष्ट्रवादी काँग्रेसची पक्ष बांधणी, तालुका कार्यकारिणी व विविध समित्यांच्या निवडीसाठी तालुक्यातील पक्ष कार्यकर्त्यांच्या जाहीर मेळाव्याचे आयोजन येथे करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.
शिंदे म्हणले, ‘‘महाराष्ट्रात सध्या तोडफोड, फूट पाडा, जातीजातींमध्ये तेढ निर्माण करा, असे भयानक प्रकार सुरू आहेत; परंतु ही महाराष्ट्राची व जिल्ह्याची संस्कृती नाही. या परिस्थितीत शरद पवार व राष्ट्रवादी पक्षाच्या विचारधारणेतून नवीन पिढी व क्रांती घडविण्याची वेळ आता आली आहे. विपरित राजकीय परिस्थितीतही वयाच्या ८२ व्या वर्षी तरुणाला लाजवेल, अशा पद्धतीने पवार यांचे काम सुरू आहे.
लोकप्रतिनिधी दुसरीकडे असले तरी सर्वसामान्य जनता मात्र शरद पवार यांच्या पाठीशी उभी असल्याचे चित्र सर्वत्र आहे. फलटण तालुकाही त्यास अपवाद नाही. तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले नीरा-देवघर, धोम-बलकवडी, रेल्वे व औद्योगिक प्रकल्प, कारखानदारीमध्ये पवार यांचे योगदान मोठे आहे. त्याची जाणीव सर्वसामान्य जनतेला आहे.’’ यावेळी रवींद्र बर्गे, प्रा. सुधीर इंगळे, माजी नगरसेवक तुकाराम गायकवाड, तानाजी जगताप आदींसह शहर व तालुक्यातील विविध गावांमधील ग्रामस्थ उपस्थित होते.
जनतेमुळे नेते निर्माण होतात. त्यामुळे आगामी काळात जनता मोठी की निवडून दिलेला नेता मोठा हे दाखवून देण्याची वेळ आली असून, तालुक्यातील जनता शरद पवार यांच्या पाठीशी उभी राहून ते निश्चितपणे दाखवून देईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |