सातारा : अपघातातील जखमीचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गणेश चौक, कोडोली येथे झालेल्या अपघातात सुहास गुलाबराव साळुंखे (वय 45, रा. विकासनगर, सातारा) यांचा मृत्यू झाला. ही घटना दि. 29 मे रोजी रात्री घडली आहे. अपघातानंतर रुग्णवाहिकेने जखमी साळुंखे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. अपघाताची माहिती पोलीस घेत आहेत.