सातारा : अस्तित्व लपवल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सेव्हन स्टार इमारतीसमोर असलेल्या साई पान शॉपच्या आडोशाला आशिष अरुण माने रा. पाटखळ, ता. सातारा हा स्वतःचे अस्तित्व लपवून अपराध करण्याच्या उद्देशाने बसल्याचे निदर्शनास आले. अधिक तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.