अभिनेत्री मृणाल ठाकूरने तेलुगू भाषेतील चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला

by Team Satara Today | published on : 30 September 2024


‘इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी’ (IIFA) हा चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा नुकताच अबु धाबीमधील यास आयलँडवर पार पडला. तीन दिवसांच्या या कार्यक्रमात बॉलिवूडसोबतच तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या चार दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा गौरव करण्यातa आला. एकीकडे हिंदीत अभिनेत्री राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर दुसरीकडे अभिनेत्री मृणाल ठाकूरने तेलुगू भाषेतील चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे. ‘हाय नाना’ या चित्रपटातील यश्नाच्या अप्रतिम भूमिकेसाठी तिला ‘आयफा’ पुरस्कार मिळाला आहे. ‘आयफा उत्सवम’मध्ये मृणालने तेलुगू भाषेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे.

‘हाय नाना’ या चित्रपटातून मृणालने तिच्या दमदार अभिनयकौशल्याची छाप प्रेक्षकांवर सोडली आहे. या भूमिकेतून तिने तिची हरहुन्नरी प्रतिभा सिद्ध केली आहे. यामुळेच अनेक दिग्दर्शकांची पहिली पसंती ही मृणालच असल्याचं पहायला मिळत आहे. प्रतिष्ठित SIIMA अवॉर्ड्समध्ये मिळालेल्या या ट्रॉफीमुळे मृणालचं चाहत्यांकडून भरभरून कौतुक होत आहे. ‘हाय नाना’ या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला ‘बेस्ट अॅक्ट्रेस’चा (क्रिटिक्स) पुरस्कार मिळाला आहे. याआधीही तिने विविध पुरस्कार पटकावले आहेत. मृणाल केवळ तेलुगू सिनेसृष्टीतच नाही तर हिंदीतही लोकप्रिय ठरत आहे.

पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना मृणाल म्हणाली, “या पुरस्काराबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे. यश्नाची भूमिका साकारणं हा माझ्यासाठी सर्वसमावेश अनुभव होता, ज्यामुळे मला प्रेम आणि भावना अधिक चांगल्याप्रकारे समजून घेता आलं. मी माझ्या या यशाचं श्रेय दिग्दर्शिक, प्रतिभावान सहकलाकारी आणि संपूर्ण टीमला देते. त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झालं नसतं. हा पुरस्कार फक्त माझा नाही. आम्हा सर्वांच्या कठोर परिश्रमाचं हे प्रतिक आहे. मला भविष्यात यांसारख्याच आणखी अर्थपूर्ण कथा प्रेक्षकांच्या भेटीला आणायच्या आहेत. हा माझ्या करिअरमधील पहिला आयफा पुरस्कार आहे.”

‘हाय नाना’ हा तेलुगू भाषेतील रोमँटिक ड्रामा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला. दिग्दर्शक शौर्युवने या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलंय. यामध्ये मृणालसोबतच अभिनेता नानीने मुख्य भूमिका साकारली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
या वर्षाचे शेवटचे सुर्यग्रहण 2 ऑ्क्टोबरला दिसणार
पुढील बातमी
तिरुपती मंदिर लाडू प्रसाद प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारवर ताशेरे

संबंधित बातम्या