'शहापूर' चा दुसऱ्या सत्रातील पाणीपुरवठा उद्या बंद

by Team Satara Today | published on : 18 December 2024


सातारा : 'शहापूर' चा दुसऱ्या सत्रातील पाणीपुरवठा उद्या बंद राहणार आहे.

सातारा शहरातील शहापूर माध्यमातून राजवाडा टाकीद्वारे पाणी वितरण होणाऱ्या सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, गुरुवार, दि. १९ डिसेंबर पासून सकाळ सत्रातील पाणीपुरवठा पूर्वीप्रमाणे सुरु राहील. दरम्यान दुपार सत्रातील होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तरी पाण्याचा वापर काटकसरीने करण्यात यावा, असे आवाहन सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केले.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्ह्यातील उड्डाण पुलांच्या कामांसाठी खा. उदयनराजे यांचा पाठपुरावा
पुढील बातमी
एकास मारहाण केल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा

संबंधित बातम्या