ख्रिस्ती समाजाचे प्रश्न तातडीने सोडवणार : ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले

by Team Satara Today | published on : 25 December 2024


सातारा : ख्रिस्ती समाजाच्या सातारा जिल्ह्यातील सर्व समस्या तातडीने सोडवणार, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा येथे दिले.

येथील ऐतिहासिक टिळक मेमोरियल चर्चमध्ये ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देताना मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते. चर्चचे धर्मगुरू रेव्ह प्रकाश भोसले यांनी व रेव्ह डिकन राजेश अल्वा यांनी देखील ख्रिसमस सणानिमित्त प्रार्थना केली. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ख्रिसमस निमित्त  टिळक मेमोरीयल चर्चला भेट दिली व ख्रिस्ती बांधवांना नाताळ निमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राचा गतीने विकास व्हावा याच्यासाठी चर्चमध्ये प्रार्थना करण्यात आली व मंत्रीपद मिळाल्या निमित्त पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

साताऱ्यातील सामाजिक उपक्रमांमध्ये आघाडीवर असलेल्या येथील माहेश्वरी ट्रस्ट तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ख्रिसमस साजरा करण्यात आला. क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालय सातारा येथे मोफत भोजन वाटप करण्यात आले.  यावेळी ट्रस्टचे सर्वेसर्वा माधव सारडा यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ पत्रकार प्रशांत पवार, शिवाजी काळभोर तसेच टिळक  मेमोरियल चर्चचे  सभासद डॅनियल खुडे, हेमप्रसाद भालेकर, जय खुडे ,पंकज खुडे ,विनीत खुडे, विपुल खुडे, अजिंक्य खुडे, हरी सोळंकी यांनी अन्नदान वाटपात सहभाग घेतला. तसेच सातारा शहरात विविध ठिकाणी यावेळी गोरगरीब लोकांना फराळ व कपडे आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. तर आठवडाभर चर्चमध्ये विविध कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. ख्रिसमस निमित्त साताऱ्यातील विविध धर्मातील लोकांनी चर्चला भेट दिली व प्रार्थना केली. तसेच येथील सेंट थॉमस चर्चमध्ये देखील प्रार्थना करण्यात आली.

टिळक मेमोरियल चर्च कमिटीचे  सचिव -अंशुमन  गायकवाड, खजिनदार कपिल गायकवाड, नरेंद्र भालेकर व ख्रिस्ती  बांधवांनी सर्व धर्मीयांमध्ये सामाजिक सलोखा निर्माण करून त्यांना खाद्य पदार्थाचे वाटप केले.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ना.जयकुमार गोरेंच्या मंत्रीपदाने युवा नेते शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानची सातारा शहरात एन्ट्री
पुढील बातमी
...अखेर जखमी रमेश जगदाळे यांचे निधन

संबंधित बातम्या