चोरट्यांनी केली आता रेल्वे लक्ष...; सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला, रेल्वेतील चोरीच्या घटना रोखायच्या कशा?

by Team Satara Today | published on : 01 December 2025


सातारा : एसटी बसमध्ये चढताना अथवा उतरताना तसेच प्रवासात महिलांचे दागिने चोरी होत असलेल्या अनेक घटना वाचायला पाहायला मिळाल्या होत्या आता मात्र चोरट्यांनी चक्क रेल्वेलाच लक्ष केले असल्यामुळे रेल्वेतील चोरीच्या घटना रोखायच्या कशा? असा प्रश्न लोहमार्ग रेल्वे पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांना पडत आहे. 

दि. २८ नोव्हेंबर रोजी अजमेर- मैसूर रेल्वे एक्सप्रेसमधून राजस्थानमधील एक प्रवासी प्रवास करत असताना अज्ञात चोरट्यांनी पर्समधील पाच तोळ्याचे मंगळसूत्र, दीड तोळ्याची सोन्याची अंगठी, दोन तोळ्याच्या सात अंगठ्या, नाकातील नथनी, दोन तोळ्यांची रुद्राक्ष सोन्याची माळ, मोबाईल असा एकूण ४ लाख ३०   हजार रुपयांचा मध्यमान चोरून घेण्याची तक्रार मिरज लोहमार्ग रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

यापूर्वी अनेकदा प्रवासी महिला एसटी बसमध्ये चढत अथवा उतरत असताना किंवा प्रवास करत असताना त्यांच्या पर्समधून सोन्याच्या दागिन्यांची चोरी होत असल्याच्या अनेक घटना ऐकायला मिळत होत्या. आता मात्र रेल्वेमध्येही अशा घटना घडू लागल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून लोहमार्ग पोलिसांनी रेल्वेमध्ये चोरी करणाऱ्या संबंधित चोरट्यांच्या मुसक्या आवळव्यात अशी मागणी प्रवाशांमधून होऊ लागली आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सदरबझारमध्ये एकाची गळफास घेऊन आत्महत्या; सहा जणांविरोधात अॅट्रॉसिटीसह गुन्हा
पुढील बातमी
साताऱ्यात दोन्ही राजांचे जोरदार शक्तिप्रदर्शन; जिल्ह्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, आज मतदान, उद्या निकाल

संबंधित बातम्या