ज्येष्ठांनी आनंदी राहण्यासाठी चार सूत्री कार्यक्रम : विजय मांडके

शाहूनगर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे व्याख्यान

by Team Satara Today | published on : 07 February 2025


सातारा : ज्येष्ठ नागरिक आनंदी राहावेत व निरोगी राहावे यासाठी त्यांना परिस्थितीशी जुळवून घेणे , पुरेसा व्यायाम करणे,  व्यस्त राहणे व सामाजिक कामात गुंतवून ठेवणे हे चार मुद्दे उपयोगी ठरतात असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक संघ सातारचे माजी कार्यवाह व ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके यांनी शाहूनगर सातारा येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.

सातारा येथील शाहू नगर जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात जेष्ठांचे सामाजिक मूल्य व आनंदी जीवन या विषयावर विजय मांडके यांचे व्याख्यान झाले त्यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अर्जुनराव घोरपडे होते विचार मंचावर कार्याध्यक्ष अशोकराव मोरे , उपाध्यक्ष रमेश जमदाडे सचिव सुदामराव निकम व हनमंतराव कणसे उपस्थित होते. 

नातवंडांवर संस्कार व समाजसेवा या दोन जबाबदाऱ्या जेष्ठांसाठी आनंददायी ठरतात असे सांगून विजय मांडके यांनी सामाजिक काम , करमणूक , बागकाम , संगीत , वाचन , लेखन समवयस्कांबरोबर गप्पा अशा अनेक कार्यांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवण्याची आवश्यकता आहे असे सांगितले.

ज्येष्ठांनी आनंदी कसे राहावे यासाठी अनेक उपक्रम यावेळी सांगितले. यावेळी वाढदिवस असलेल्या सभासदांचे सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच ज्ञात-अज्ञात अशा मान्यवर व्यक्ती ज्या निधन पावल्या आहेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

रमेश जमदाडे यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. अशोकराव मोरे यांनी सूत्रसंचालन केले.आभार सूर्यकांत नलावडे यांनी मानले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा येथे रंगणार तीन दिवस तमाशा महोत्सव
पुढील बातमी
वाई येथे 8 व 9 फेब्रुवारी कालावधीत ग्रंथमहोत्सव

संबंधित बातम्या