सातारा : जिल्हा रुग्णालयातून एकजण बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 30 रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथून संतोष राजाराम जाबीर रा. सुलतानपूर, ता. वाई, जि. सातारा हे कोणास काही एक न सांगता निघून गेले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा