कराड : येथील पोलिस उपअधीक्षक कार्यालयासमोरील पोलिस वसाहतीच्या जागी संरक्षक भिंतीचे काम पोलिस प्रशासनाकडून कालपासून सुरू करण्यात आले आहे. ते काम प्रार्थना स्थळालगत असून, त्याशेजारील रस्त्यावरून काल दुपारी संबंधित समाज बांधव आणि पोलिस प्रशासन एकमेकांना भिडले. या वेळी झालेल्या वादावादी आणि धराधरीत तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी याप्रकरणी सुमारे दहाहून अधिक जणांना ताब्यात घेतले.
दरम्यान, समाज बांधवांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांशी याप्रकरणी चर्चा केली. त्यानंतर तणाव निवळला. येथील पोलिस उपअधीक्षक कार्यालयासमोर ब्रिटिशांच्या काळापासून पोलिस वसाहत होती. ती वसाहत वापरास अयोग्य झाल्याने त्याचा वापरही बंद होता. अनेक वर्षे ती जागा तशीच पडून होती. त्या जागेला संरक्षत भिंत बांधण्यासाठी सुमारे तीन महिन्यांपूर्वी पोलिस खात्याकडून मोजणीही करून घेण्यात आली होती. त्या वेळी पोलिसांच्या जागेच्या हद्दीच्या खुणाही करण्यात आल्या होत्या.
त्या वेळी संबंधित समाजाच्या शिष्टमंडळासोबत बैठकही झाली होती. त्यावेळी आचारसंहिता संपल्यानंतर काम सुरू करण्यात येणार असल्याचे संबंधितांना सांगितल्याचे पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी सांगितले. दरम्यान लोकसभा निवडणुकीची मतमोजणी संपल्यानंतर कालपासून पोलिसांनी संबंधित ठिकाणी संरक्षित भिंत बांधण्यासाठी काम सुरू केले. त्या वेळी काल त्यास विरोध झाला. त्या वेळी वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांच्याशी त्यांचा वाद झाला. त्यावरून पोलिस उपअधीक्षक ठाकूर यांच्यासमवेत सायंकाळी बैठक झाली. त्या बैठकीत समाजाच्या शिष्टमंडळाने काही अवधी मागून घेत वरिष्ठ पातळीवरून आदेश आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते.
त्यानंतर पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी शिष्टमंडळास भेटीसाठी आज बोलावले होते. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक अतुल सबनीस यांना जागेची पाहणी करण्यासाठी येथे पाचारण करण्यात आले होते. आज दुपारपर्यंत वरिष्ठ पातळीवरून कोणतेही आदेश आले नसल्याने दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलिस प्रशासनाने पुन्हा जेसीबीच्या साहाय्याने भिंतीसाठी चर खोदण्यास सुरुवात केली. यावेळी संबंधित समाजातील तरुण व लगतच्या दरवेशी वस्तीतील महिलांनी पोलिसांशी वाद घालत काम रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गोंधळ वाढत गेला. त्या वेळी काही महिला जेसीबीच्या समोर येऊन त्यांना काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्याचदरम्यान पोलिसांनीही त्या महिलांना बाजूला केले. त्यानंतर वाद वाढत गेला.
या वेळी झालेल्या वादावादीत तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले. त्यामुळे पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या सुमारे १० हून अधिक युवकांना व काही महिलांनाही ताब्यात घेतले. सुमारे अर्धा तास गोंधळ झाल्यानंतर काही लोकांशी चर्चा करत परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. सायंकाळी पाचच्या सुमारास साताऱ्याला बैठकीसाठी गेलेले मजहर कागदी, अल्ताफ शिकलगार, फारुक पटवेकर, इसाक सवार, बरकत पटवेकर, साबीर मुल्ला यांच्यासह राजेंद्र यादव व समाजातील वरिष्ठ घटनास्थळी आले. शिवराज मोरे हे ही त्यानंतर तेथे आले. त्यांनी पोलिस उपअधीक्षक अतुल सबनीस, अमोल ठाकूर व के. एन. पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर साताऱ्यात झालेल्या बैठकीचा माहिती देत वाद मिटविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. सायंकाळनंतर त्यास यश आले. त्यामुळे निर्माण झालेल्या वादाला आजतरी पूर्णविराम मिळाला आहे.
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |