सातारा : उदयोन्मुख दिग्दर्शक-सिनेमोटोग्राफर अमन फिरोज खान यांच्या एफ.बी.के फिल्म प्रॉडक्शनच्या ‘लव्हेरिया झाला मला’ या नव्याकोर्या म्युझिक अल्बमचे सातारा येथील हॉटेल ग्रीन फिल्ड येथे पत्रकार, तसेच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये काल दि. 21 रोजी शानदार लॉन्चिंग करण्यात आले.
‘लव्हेरिया झाला मला’ या टायटलद्वारे उदयोन्मुख अभिनेत्री काजल गोसावी व रिलस्टार प्रियेश चव्हाण अभिनीत अतीशय संगीतप्रधान व अवीट गोडीच्या सुरांनी सजलेला हा अल्बम येत्या काळामध्ये यू-ट्युब, आय ट्यून, जियो सावन व स्पॉटीफाय या सारख्या म्यूझिक प्लॅटफॉर्मवर या अल्बमची गाणी लवकरच रसिकांना भुरळ घालणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहूनही दिग्दर्शक-सिनेमोटोग्राफर अमन फिरोज खान, अभिनेत्री काजल गोसावी, गीत-संगीतकार ऋषिकेश मोरे, शेखर नवतरे आदींनी आपल्या प्रतिभेद्वारे मराठी चित्रपटसृष्टीला हातभार लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. यापूर्वीही या टीमने चित्रपट, वेबसिरीज व शॉर्ट फिल्मद्वारे आपल्या कलात्मकतेची चुणूक दर्शकांना दाखवून दिली आहे. याच टीमने नुकताच ‘लव्हेरिया झाला मला’ हा संगीतप्रधान म्युझिक अल्बमची निर्मिती केली असून या अल्बमचे पोस्टर लॉन्चिंग काल दि. 21 रोजी सातारा येथील हॉटेल ग्रीन फिल्ड येथे करण्यात आले.
या पोस्टरचे लॉन्चिंग सातारा येथील साहित्यिक अरुण जावळे, सातारा टुडे चे संपादक संग्राम निकाळजे, विनित जवळकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी सागर भोगांवकर, उद्योजक रवीराज किर्दत, बाळासाहेब उर्फ आकाश खुडे यांच्या हस्ते करण्यात आले.