मी सुमारे ३० वर्षांपूर्वी फिल्म इंडस्ट्रीत एन्ट्री केली तेव्हाचा काळ खूप वेगळा होता : मनिषा कोईराला

by Team Satara Today | published on : 27 November 2024


फिल्ममेकर विक्रमादित्य मोटवानी आयोजित आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवामध्ये मनिषा कोईरालाही सहभागी झाली होती. यावेळी ती म्हणाली, "जेव्हा मी सुमारे ३० वर्षांपूर्वी फिल्म इंडस्ट्रीत एन्ट्री केली तेव्हाचा काळ खूप वेगळा होता. तेव्हा येलो जर्नलिझम मोठ्या स्केलवर होतं. प्रत्येकाने माझ्या अभिनय करण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला होता. चांगल्या घरातल्या मुली अभिनय क्षेत्रात येत नाही असा तेव्हा सगळ्यांचा समज होता. मात्र माझा पहिलाच सिनेमा हिट झाला मी माझा प्रवास असाच सुरु ठेवला. त्यामुळे जे माझ्यावर टीका करत होते त्यांनाच माझा अभिमान वाटायला लागला." 

ती पुढे म्हणाली, "एक वेब सीरिज करतानाही मी याच प्रश्नांना सामोरी गेले होते. जेव्हा मला हीरामंडीसाठी विचारणा झाली तेव्हा मला ओटीटीवर पदार्पण करण्यात काहीच शंका नव्हती. मला सुरुवातीपासूनच सीरिजवर विश्वास होता. सीरिज संजय भन्साळींची आहे म्हणूनच नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्म आता गेमचेंजर बनत चालला आहे यामुळे होकार दिला."

मनिषा कोईराला आता 'हीरामंडी 2'मध्ये दिसणार आहे. अद्याप सीरिजचं शूट सुरु झालेलं नाही मात्र सीक्वेलची घोषणा झाली आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खंबाटकी घाटात विवाहितेचा मृतदेह आढळला
पुढील बातमी
आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली तुळस आरोग्यासाठी आहे गुणकारी

संबंधित बातम्या