भाजपला वगळून शिवसेना व राष्ट्रवादी नेत्यांची गोपनीय खलबते; एकत्र लढण्यासंदर्भातील रणनीतीची प्राथमिक चर्चा, 'कोयना दौलत'वर पालकमंत्र्यांचे बेरजेचे राजकारण

by Team Satara Today | published on : 16 January 2026


सातारा  : यशवंत विचाराच्या सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना वगळून शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजितदादा पवार गट यांच्या नेत्यांची चर्चेची प्राथमिक फेरी पालकमंत्री शंभूराजे यांच्या पोवई नाक्यावरील कोयना दौलत या बंगल्यावर पार पडली.

फलटणचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी पालकमंत्र्यांचा चहा गोड होता असे हसून सांगत बरेच काही सांगितले. बैठकीला राष्ट्रवादीचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील खासदार नितीन पाटील रामराजे नाईक निंबाळकर संजीव राजे नाईक निंबाळकर उपस्थित होते. या बैठकीमध्ये बंद दाराआड जोरदार खलबती झाली. सातारा जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा वारू रोखण्यासाठी एकत्रितपणे रणनीती आखण्याची गरज आहे.  या विषयाच्या संदर्भाने प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे. भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवत पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची संधान साधत नवीन रणनीती आखण्याची सुरुवात केल्याची संकेत मिळत आहेत. भाजपने यापूर्वीच स्वबळावर लढण्याचे जाहीर केले आहे. पालकमंत्री देसाई यांनी एकत्र लढण्यासाठी आज चर्चेला बोलवले होते. त्यानुसार चर्चेची पहिली फेरी झाल्याचे खासदार नितीन पाटील यांनी स्पष्ट केले.

प्रसार माध्यमांनी खासदार नितीन काका पाटील यांना गाठले आणि भाजपचे आमदार व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या धसक्याने आपण एकत्र आला आहात का यावर नितीन पाटील म्हणाले, कोणता धक्का ? भाजप पक्ष वाईत पूर्वीपासून आहे. मदन भोसले त्यांच्यासोबत आहेत. गोरे यांच्या धक्कयाचा काय संबंध ? पालकमंत्री व आम्ही दोघे बसलो होतो. अद्याप सर्वकाही चर्चेच्या पातळीवर आहे.  आम्ही भाजपला डावलले असे नाही पालकमंत्र्यांनी त्यांना चर्चेला बोलवावे. आमची काही हरकत नाही. या बैठकीनंतर खा. नितीन  पाटील यांनी अत्यंत त्रोटक माहिती देत तेथून निघून जाणे पसंत केले. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दीडशे वर्षांचा ब्रिटिशकालीन पूल पाडला ना ?
पुढील बातमी
राजपथ व राधिका रोडचे होणार काँक्रिटीकरण; ना. शिवेंद्रसिंहराजे यांची माहिती : सातारा पालिकेत व्यापाऱ्यांसमवेत बैठक

संबंधित बातम्या