उच्च रक्तदाब म्हणजे काय ?
उच्च रक्तदाब हा एक सायलंट किलर आहे. जो हळूहळू गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकतो. झोपेमुळे बीपीची समस्या कशी उद्भवते आणि ही समस्या कमी करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करू शकता ते आपण समजून घेऊया.
झोप आणि उच्च रक्तदाब यांच्यात काय संबंध आहे?
अनेकदा उच्च रक्तदाब ही वृद्धांची समस्या मानतो. परंतु आजच्या धकाधकीच्या लाईफस्टाइलमध्ये अनेक तरुणही पूर्वीपेक्षा लवकर उच्च रक्तदाबाचे बळी ठरत आहेत. याचे एक प्रमुख कारण म्हणजे योग्य झोप न मिळणे किंवा झोपेची गुणवत्ता कमी असणे. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले शरीर दुरुस्त आणि पुनर्प्राप्त होण्यास सुरुवात करते.
त्याच वेळी, आपल्या ताणाशी संबंधित हार्मोन्स, जसे की कोलेस्टेरॉल आणि एड्रेनालिन, संतुलित असतात. पण जर आपण कमी झोपलो किंवा वारंवार जागे झालो तर हे हार्मोन्स जास्त प्रमाणात तयार होऊ लागतात आणि आपले शरीर सतर्क स्थितीत जाते. या सततच्या ताणामुळे रक्तदाब हळूहळू वाढू लागतो.
वैज्ञानिक तथ्ये काय सांगतात?
आज, अनेक वैद्यकीय आणि वैज्ञानिक संशोधनांमधून स्पष्ट दिसून येतं आहे की झोपेचा कालावधी आणि उच्च रक्तदाब यांच्यात खोलवर संबंध आहे. उदाहरणार्थ, हायपरटेन्शन जर्नलमध्ये अलीकडेच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की जे लोक दिवसातून सहा तासांपेक्षा कमी झोपतात त्यांना उच्च रक्तदाब होण्याची शक्यता जास्त असते. फक्त झोपेची वेळच नाही तर त्याची गुणवत्ता देखील तितकीच महत्त्वाची आहे.
जर झोपेत वारंवार अडथळा येत असेल किंवा एखाद्याला स्लीप एपनिया सारखा झोपेचा विकार असेल , तर चांगल्या झोपेदरम्यान होणारा रक्तदाब नैसर्गिकरित्या कमी होत नाही. याचा अर्थ शरीराचे हृदय आणि रक्तवाहिन्या सतत दाबाखाली असतात.
याशिवाय, सतत कमी झोपेमुळे हृदयरोग, पचनासंबंधित विकार आणि लठ्ठपणा यासारख्या गंभीर समस्यांचा धोका वाढतो. म्हणूनच, चांगली झोप केवळ थकवा दूर करण्यासाठीच महत्त्वाची नाही तर तुमच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी देखील खूप महत्त्वाची आहे.
पुरेशा झोपेसाठी काय करावं?
झोपण्याची आणि उठण्याची वेळ नियमित ठेवा
विकेंडमध्ये देखील दररोज त्याच वेळी झोपायला जाण्याचा आणि उठण्याचा प्रयत्न करा.
रात्री स्क्रीन टाइम कमी करा
मोबाईल आणि लॅपटॉपचा निळा प्रकाश झोपेच्या नैसर्गिक लयीत अडथळा आणतो. झोपण्याच्या एक तास आधी स्क्रीनपासून दूर रहा.
झोपेसाठी चांगले वातावरण तयार करा
तुम्ही ज्या खोलीत झोपणार आहे. तेथे खोली थंड, अंधारी आणि शांत वातावरण अशावे. अशा वातावरणात झोप लवकर आणि गाढ येते.
पुढील पेयांचे सेवन टाळा
झोपण्यापूर्वी कॅफिन, अल्कोहोल आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. यामुळे झोपेत व्यत्यय येऊ शकतो आणि तुम्हाला उशिरापर्यंत जागे राहावे लागू शकते.
नियमित व्यायाम करा
जोपण्यापूर्वी सोपा आणि हलका व्यायाम करावा. ज्यामुळ मनं शांत राहील आणि चांगली झोप लागले.