सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण, महिला व बालकल्याण आणि इतर दोन विषय समित्यांच्या सभापती पदासाठी ४ एप्रिल २०२६ रोजी दुसरी विशेष सभा आयोजित करण्यात आली. यामध्ये चार नामनिर्देशनपत्र दाखल झाली. छाननी अंती कोणाताही अक्षेप नसल्याने चारही नामनिर्देशनपत्रे स्वीकृत करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जाहीर केले.
यामध्ये ऋतुजा विराज शिंदे यांनी महिला व बाल कल्याण सभापती पदासाठी, ऋषीकेश धायगुडे-पाटील यांनी समाज कल्याण समिती सभापती पदासाठी, लता अविनाश कर्णे आणि तेजस्विनी विक्रमशिल कदम यांनी विषय समिती सभापदी पदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल केली होती. चारही नामनिर्देशन पत्रे प्रत्येक पदासाठी प्रत्येकी एक नामनिर्देशनपत्र आल्याने या चार जणांची निवड करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी घोषीत केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण, तहसीलदार समीर यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले आदी उपस्थित होते.