अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

by Team Satara Today | published on : 08 August 2024


सातारा : अल्पवयीन मुलीने घरात ओढणीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
सलीम जोहराउद्दिन बागवान वय 54 राहणार तेली खड्डा शनिवार पेठ यांनी या घटनेची खबर सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरशा सलीम बागवान वय 17 असे मयत युवतीचे नाव आहे. दि. 7 ऑगस्ट रोजी दुपारी एक पूर्वी घरात कोणी नसताना आरशा हिने लाकडी तुळईला लाल आणि हिरव्या रंगाच्या दोन ओढणीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्त्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही. पोलीस हवालदार मोहिते अधिक तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सासू-सुने च्या मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी
पुढील बातमी
खंडणी प्रकरणी चौघांवर गुन्हा

संबंधित बातम्या