09:16pm | Dec 05, 2023 |
सातारा : मराठा आरक्षणाच्या संदर्भात ठोस भूमिका राजकीय दृष्टिकोनातून घेतली जावी, याकरिता राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची मराठा क्रांती मोर्चा सातारा सुकाणू समितीच्या समन्वयकांनी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये भेट घेतली.
मराठा आरक्षणाच्या विषयावर यावेळी सुमारे पाऊण तास चर्चा करण्यात आली. यावेळी मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक बापू क्षीरसागर, एडवोकेट उमेश शिर्के, वैभव शिंदे, प्रशांत निंबाळकर, शरद जाधव, तात्या सावंत, भागवत कदम, विशाल महाडिक इत्यादी उपस्थित होते
समन्वयकांच्या वतीने त्यांची भूमिका मांडण्यात आली. संपूर्ण राज्यांमध्ये सातारा जिल्ह्याने सर्वात जास्त साथ शरद पवार यांना दिली आहे. त्यामुळे आता जिल्हावासियांना मराठा आरक्षण मिळावे याकरिता आम्ही हक्काने दाद मागत आहोत. या संदर्भात आपण तातडीने लक्ष घालून सरकारला मार्गदर्शक सहकार्य करावे व आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा व न्यायिक कसोटीवर टिकणारे आरक्षण देण्यासंदर्भात राजकीय पातळीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करावी, अशी मागणी यावेळी पवार यांच्याकडे करण्यात आली.
या संदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले, मराठा आरक्षणाच्या संदर्भातील बैठकीला मी सुद्धा उपस्थित होतो. आरक्षणासंदर्भात सहकार सरकारला पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका राष्ट्रवादी पक्षाने घेतली आहे. लोकसभेत आपल्या पक्षातर्फे मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न उपस्थित केला जावा, या मागणीवर बोलताना पवार पुढे म्हणाले, मी आजच जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहे. तसेच तेथे उपस्थित असणारे सातारा लोकसभेचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सुद्धा केंद्राच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न लोकसभेत करणार असल्याचे पवार साहेबांच्या निर्देशानंतर सांगितले.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |