औंध : खटाव तालुक्यातील गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर्स या साखर कारखान्याकडून ऊसतोडणी व वाहतूक करण्यासाठी दिलेली ७४ लाखांची रक्कम घेऊन दुसर्याच कारखान्याची ऊसतोडणी व वाहतूक करून फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील वाकी येथील नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश बळीराम वायकर, सारंग कोंडीबा गायकवाड, शहाजी केरा गायकवाड, छगन प्रल्हाद साठे, हनुमंत आबा वायकर, रमेश बलभीम पोडमल, संजय अर्जुन पोडमल, विनोद बळीराम वाईकर, श्रीधर तुकाराम जगताप (सर्व रा. वाकी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत औंध पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, ग्रीन पॉवर शुगर्स या कारखान्याला ऊसतोडणी वाहतूक करार २१ जून २०२२ रोजी करून ऊसतोडणी व वाहतूक करण्याकामी येण्यासाठी २२ जुलै २०२२ ते १० ऑक्टोबर २०२२ या कालावधीत कारखान्याच्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक शाखाकडे पूरच्या खात्यावरून ७४ लाख रुपये दिले होते.
आरोपींनी आपापसात संगनमत करून फिर्यादीचा विश्वास संपादन करून ग्रीन पॉवर कारखान्याने दिलेल्या पैशाचा स्वतःच्या फायद्यासाठी गैरवापर करून इतर कारखान्यांना ऊस वाहतूक करून कारखान्याची फसवणूक केली असल्याची फिर्याद चंद्रकांत जगनाथ मोहिते हेड क्लर्क शेती विभाग, ग्रीन पॉवर शुगर्स गोपूज यांनी दिली आहे. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ए.ए. ठिकणे तपास करीत आहेत.
ऊस हंगामाच्या काळात अनेक टोळ्या कारखान्यांकडून पैसे उचलतात. मात्र, कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून दिलेल्या पैशाबाबत ठेकेदार बांधिल राहत नाहीत. प्रत्येक हंगामात अशा फसवणुकीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे कारखान्यांनी यांत्रिक पद्धतीने ऊसतोडीवर जोर दिला आहे. तरीदेखील शेतककर्यांच्या मागणीमुळे कारखान्यांना टोळ्यांवर अवलंबून राहावे लागते. मात्र, टोळीप्रमुख पैशाच्या आमिषाने कारखानदारांचीही फसवणूक करत असल्याचे समोर येत आहे.
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |