सातारा : अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शाहूपुरी, सातारा येथे उमाकांत शिवाजी नलावडे रा. कांगा कॉलनी, सदर बाजार, सातारा हे पायी चालत असताना ट्रॅव्हल्स क्र. एमएच 01 ईई 5657 वरील चालक बबलू चव्हाण राहणार मुंबई याने त्याच्या ताब्यातील ट्रॅव्हल्स भरधाव वेगात चालवून उमाकांत नलावडे यांना पाठीमागून धडक दिल्याने ते जखमी झाले आहेत. अधिक तपास महिला पोलीस हवालदार वरे करीत आहेत.
अपघात प्रकरणी ट्रॅव्हल्स चालकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 27 January 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
म्हसवे येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या
March 21, 2026
मर्ढेकर यांनी कवितेला नवे परिमाण दिले : डॉ. माने
March 21, 2026
सातारा झेडपीमध्ये ‘डर्टी गेम’
March 21, 2026
घरफोडीच्या तयारीत असलेली टोळी तालुका पोलिसांनी केली जेरबंद
March 19, 2026