नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी घेतली उदयनराजे यांची भेट; सातारा शहराच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही

by Team Satara Today | published on : 24 December 2025


सातारा  : साताऱ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी बुधवारी खासदार उदयनराजे भोसले यांची पुणे येथे भेट घेतली. या भेटीवेळी उदयनराजे यांनी  अमोल मोहिते यांच्या पाठीवर  कौतुकाची थाप टाकतानाच सातारा शहराच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी माजी नगरसेवक जयेंद्र चव्हाण उपस्थित होते.

नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या विजयाची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा झाली. 42 हजार 32 इतक्या विक्रमी मताधिक्याने अमोल मोहिते निवडून आले .या मताधिक्याच्या संदर्भात उदयनराजे भोसले यांनी अमोल मोहिते यांचे विशेष कौतुक केले. अमोल मोहिते व उदयनराजे यांनी सातारा शहराच्या विकास आराखड्यात संदर्भात चर्चा केल्याची माहिती आहे .सातारा शहराच्या विकासासाठी तसेच विकास प्रकल्पांसाठी लागणारा निधी जास्तीत जास्त पद्धतीने मंजूर करण्यासंदर्भात उदयनराजे भोसले यांनी नगराध्यक्ष नाग्वाही दिल्याचे निकीट वरती सूत्रांनी सांगितले .दरम्यान, प्रभाग १४ मधून अपक्ष निवडून आलेल्या नगरसेविका दिनाज शेख यांनीदेखील उदनयराजे यांची भेट घेतली. यावेळी नासिर  शेख यांच्यासह पदाधिकारी व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
हिंदवी पब्लिक स्कूलकडून 100 पथनाट्याचे यशस्वीरित्या सादरीकरण; सातारा जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम
पुढील बातमी
मोती चौकात अगरबत्ती आणि चप्पल व्यावसायिकांमध्ये वाद; परस्पर विरोधी तक्रारी

संबंधित बातम्या