सातारा : राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 ते 14 जुलै दरम्यान सातारा तालुक्यातील एका गावात राहणारी वीस वर्षीय युवती राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गोरे करीत आहेत.