सातारा : सातारा शहर हद्दीत संशयास्पद हालचाली करत स्वत:चे अस्तित्व लपवून गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याच्या आरोपाखाली दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश रमेश माने (वय ४८, रा. शनिवार पेठ, सातारा) हा रिमांड होम शेजारील इदगाह मैदान परिसरात चेहरा झाकून मोकळ्या जागेत संशयास्पदरीत्या बसलेला आढळून आला. पोलिस पेट्रोलिंगदरम्यान ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच संजीवन हॉस्पिटलसमोरील शॉपिंग सेंटर परिसरात एका दुकानाच्या आडोशाला बसलेला ओमकार सुरेंद्र पासवान (वय २८, रा. तन्वी प्लाझा, करवीर, कोल्हापूर) हा देखील गुन्हा करण्याच्या उद्देशाने बसल्याचे आढळून आले.
दोघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार महांगडे व पोलीस नाईक मोहिते करत आहेत.