धुळे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राज्यात विविध ठिकाणी राजकीय सभा होत आहे. धुळ्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर सांगलीतून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मैदानात उतरले आहेत. धुळ्यातील सभेत नरेंद्र मोदी यांनी महायुती सरकारच्या योजना आणि विविध प्रकल्पाबाबत माहिती दिली. तसेच महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामधील वाढवण बंदराबाबतची महत्वाची माहिती देखील नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली.
इलेक्ट्रॉनिक वाहन परियोजना, स्टील प्रोजेक्ट, ग्रीन प्रोजेक्ट असे राज्यातील वेगवेगळ्या भागात स्थापित केले जात आहे. महाराष्ट्रात वाढवण बंद देखील होत आहे. मूलभूत सुविधा मुळे रोजगाराच्या नवीन संधी मिळत आहेत. वाढवण बंदरासाठी मी आलो होतो, तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले, एवढे सर्व करत आहात तर तिथे एक विमानतळ देखील द्या...मी आज देवेंद्र फडणवीसांना सांगतो...जेव्हा राज्यात महायुतीचे सरकार येईल, आचारसंहिता संपले, तेव्हा वाढवण येथील विमानतळाबाबत देखील निर्णय घेऊ असं आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले.
शेतकऱ्यांना देखील डबल फायदा होत आहे. नमो शेतकरीचे 6 हजार आणि पीएम किसान योजना असे 12 हजार रुपये मिळत आहेत. आता महायुतीचे सरकार आल्यास ही रक्कम 15 हजार रुपये करण्यात येणार, अशी घोषणा नरेंद्र मोदींनी केली. विरोधक नारी शक्तीला सशक्त होऊ देत नाहीय. हे लोक महिलांना शिव्या देत आहेत. राज्यातील महिला महाविकास आघाडीला माफ करणार नाही.
मातृभाषा आपली आई असते, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. अनेक वर्षांचे स्वप्न होते. हे आमच्या सरकाने पूर्ण केले. काँग्रेसची राज्यात आणि केंद्रात सत्ता होती, तेव्हा अभिजात भाषेचा दर्जा देण्याची गरज त्यांना वाटत नाही. त्यांना अजूनही त्रास होतोय की, हे आम्ही कसे केले...महाराष्ट्रामधील डबल इंजिन सरकारने केलेलं काम संपूर्ण जग पाहत आहे. सलग दोन वर्षे महाराष्ट्र परदेशी गुंतवणूकमध्ये 1 नंबरचं राज्य आहे, असंही नरेंद्र मोदींनी सांगितले. काँगेसने इतके वर्ष राज्य केले. मग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान जम्मू-काश्मीरमध्ये लागू का केले नाही?, असा सवालही नरेंद्र मोदींनी उपस्थित केला.
विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारतचा आधार महायुतीचा वचनमनामा बनेल. मागील 10 वर्षात महिलांना केंद्रित अनेक योजना आणल्या. मागील सरकारने महिलांना रस्ता अडवला होता. आम्ही सर्व अडथळे दूर केले, सर्व दरवाजे खोलले. महिलांना आरक्षण दिले, शौचालय ते गॅस सिलेंडर आशा प्रत्येक ठिकाणी महिला केंद्रस्थानी आहेत. महायुती सरकारने आईचे नाव अनिवार्य केले आहे. सर्वांनी या निर्णयाचे स्वागत केले. महिलांचे सामर्थ्य वाढत आहेत, मुलींना रोजगार मिळणार, महिला सशक्तीकरणसाठी आमचे सरकार पावले उचलत आहेत ते आमच्या विरोधकांना सहन होत नाहीय. माझी लाडकी बहिण योजनांची देशभरात चर्चा आहे. काँग्रेसचे लोक योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले. त्यांना सत्ता मिळाली तर ही योजना बंद करतील, अशी टीकाही नरेंद्र मोदींनी केली.