हात आणि पायांमध्ये मुंग्या येणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. अनेक वेळा एकाच स्थितीत बराच वेळ बसल्याने किंवा हात आणि पाय बराच वेळ दाबून ठेवल्याने, हात आणि पायांमध्ये मुंग्या येतात. परंतु काही लोकांना संपूर्ण शरीरात मुंग्या येणे जाणवते, जे एखाद्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते.
अशावेळी व्यक्तीला असे वाटते की कोणीतरी संपूर्ण शरीरावर सुई टोचत आहे. जर तुम्हाला वारंवार या समस्येचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही समस्या का उद्भवते आणि यावर घरगुती उपाय कोणते हे जाणून घेऊया.
संपूर्ण शरीरात मुंग्या का येतात?
शरीरात योग्य रक्ताभिसरण होत नसेल तर मुंग्या येणेची समस्या वाढू शकते.
मज्जातंतूला झालेल्या नुकसानामुळे संपूर्ण शरीरात मुंग्या येणे होऊ शकते.
पाठीच्या नसांवर जास्त दाब पडल्यामुळेही शरीरात मुंग्या येणे जाणवू शकते.
परिधीय नसांवर दाब पडल्यामुळे, एखाद्या व्यक्तीला शरीरात मुंग्या येणे जाणवू शकते.
शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे देखील शरीरात मुंग्या येऊ शकतात.
जास्त प्रमाणात औषधे घेतल्याने किंवा काही औषधांच्या दुष्परिणामामुळे शरीरात मुंग्या येऊ शकतात.
कार्पल टनेल सिंड्रोम, मधुमेह, मल्टिपल स्क्लेरोसिस, थायरॉईड आणि रक्तवाहिन्यांचे अरुंद होणे यासारख्या काही वैद्यकीय परिस्थितींमुळे संपूर्ण शरीरात मुंग्या येऊ शकतात.
रेडिएशन थेरपी आणि केमोथेरपीमुळे नसा खराब होऊ शकतात, ज्यामुळे संपूर्ण शरीरात मुंग्या येतात.
घरगुती उपाय कोणते करावे?
आहारात पोषक पदार्थांचा समावेश करावा.
नियमितपणे योगा आणि व्यायाम करावा.
कोमट तेलाने संपुर्ण शरीराची मसाज करावी.
जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधावा.
तसेच वेळीच उपचार सुरू करावे.