अपघात प्रकरणी महिलेवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 05 January 2025


सातारा : दुचाकी अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी महिलेविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 30 डिसेंबर रोजी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पुणे सातारा महामार्गावर लालासो श्रीपती काळे रा. रामनगर, पोस्ट वर्ये, ता. सातारा यांच्या दुचाकीस पाठीमागून भरधाव वेगात धडक देऊन त्यांना जखमी केल्याप्रकरणी एक्टिवा मोटरसायकल क्र. एमएच 11 सीके 4729 ची चालक मनीषा कुंडलिक तांबे उर्फ सौ मनीषा निलेश वळकुंडे रा. अहिरे, ता. खंडाळा, जि. सातारा यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता
पुढील बातमी
कोयना परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

संबंधित बातम्या