हिज्बुल्लाह विरोधात सुरु केलेल्या लढाईत इस्रायलला मोठ यश मिळालं आहे. इस्रायलने लेबनानकडे मोर्चा वळवल्यानंतर आठवड्याभराच्या आताच हिज्बुल्लाह चीफ हसन नसरल्लाहचा खात्मा केला आहे. इस्रायलने लेबनानची राजधानी बेरुतमध्ये हिज्बुल्लाहच्या मुख्यालयावर भीषण हल्ला केला. IDF ने 60 बंकरविरोधी रॉकेटने हिज्बुल्लाहच्या मुख्यालयाला टार्गेट केलं. हिज्बुल्लाहच्या टॉप कमांडरला टार्गेट करण्याच्या उद्देशाने हा हल्ला केला असं इस्रायली अधिकाऱ्याने सांगितलं होतं. या हल्ल्यात हिज्बुल्लाह चीफ नसरल्लाह मारला गेला की नाही? या बद्दल लगेच काही बोलणं घाईच ठरेल, असं हल्ल्यानंतर इस्रायलने म्हटलं होतं. पण आता इस्रायलच्या डिफेन्स फोर्सने अधिकृत X हँडलवर पोस्ट करुन हसन नसरल्लाह मारला गेल्याचा दावा केला आहे. ‘हसन नसरल्लाह आता जगाला घाबरवू करु शकत नाही’ असं इस्रायल डिफेन्स फोर्सने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“हिज्बुल्लाह या दहशतवादी संघटनेचा नेता हसन नसरल्लाह आणि दक्षिणी मोर्चाचा कमांडर अली कारचीसह अन्य कमांडर्सचा खात्मा केलाय” असं आयडीएफ प्रवक्ते डेनियल हगारी यांनी म्हटलं आहे. इस्रायली गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या अचूक गोपनीय माहितीच्या आधारावर आमच्या एअर फोर्सच्या फायटर जेट्सनी हिज्बुल्लाहच्या सेंट्रल हेडक्वार्टरवर टार्गेटेड हल्ला केला. बेरुतच्या दाहियेह क्षेत्रात एका रेसिडेंशियल बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये मुख्यालय होतं. हिज्बुल्लाहची सीनियर लीडरशिप हेडक्वार्टरमध्ये बसून इस्रायली नागरिकांविरोधात दहशतवादी कारवायांची आखणी करत असताना हा हल्ला झाला.
हिज्बुल्लाह चीफ म्हणून हसन नसरल्लाहवर 32 वर्षाच्या कार्यकाळात इस्रायली नागरिक आणि सैनिकांची हत्या तसच हजारो दहशतवादी हल्ल्याच्या योजना आखणीचे आरोप त्याच्यावर होते. जगभरात दहशतवादी हल्ले घडवण्यासाठी हसन नसरल्लाह जबाबदार होता. विभिन्न देशातील निरपराध नागरिकांचा यामुळे मृत्यू झाला. हिज्बुल्लाहमध्ये नसरल्लाह सर्व मुख्य निर्णय घ्यायचा व रणनिती आखायचा” असं डेनियल हगारी यांनी सांगितलं.
इस्रायलच गाजा पट्टीत हमास विरुद्ध युद्ध सुरु असताना लेबनानमधून हिज्बुल्लाहकडून उत्तर इस्रायलवर रॉकेट हल्ले सुरु होते. यामुळे मोठ्या प्रमाणात उत्तर इस्रायलमधून नागरिकांना विस्थापित व्हावं लागलं. हमास विरुद्ध उद्दिष्ट साध्य केल्यानंतर इस्रायलने हिज्बुल्लाहकडे मोर्चा वळवला. आठवड्याभराच्या आत इस्रायलने हिज्बुल्लाहची निम्मी सैन्य शक्ती संपवून टाकली व त्यांच्या प्रमुखालाच संपवलं.
रेकी करून ट्रॅक्टर चोरी करणार्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश |
लाडकी बहीण योजनेमुळे शरद पवारांच्या पोटात दुखतंय |
पाचगणी येथे पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेचे स्वागत |
अवैध फटाका विक्री करणार्या दोघांवर गुन्हा |
पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे भटक्या बैलाला रेबीजचा संसर्ग |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
मसाप शाहुपुरी शाखेच्यावतीने पोवई नाक्यावर साखर वाटप |
महिला अडचणीत असताना गृह खात्याच्या झोपा |
हिंदू बहुजन सन्मान यात्रेचे सातारा शहरात उस्फुर्त स्वागत |
श्वानांचे मुखवटे झळकवून गणेश वाघमारे यांचे पालिकेसमोर आंदोलन |
सालोशी येथील बांबू हस्तकला प्रशिक्षणाला उस्फूर्त प्रतिसाद |