सातारा : वीरशैव लिंगायत तिराळी समाज सातारा जिल्हा समितीच्या वतीने रविवारी (दि. २३) बुधवार पेठ, सातारा येथील औंधकर महाराज मठात राज्यस्तरीय सर्व लिंगायत समाज वधू-वर व पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्रभर विखुरलेल्या वीरशैव लिंगायत तिराळी समाजात अनुरूप स्थळ शोधण्यासाठी पालकांची होणारी धावाधाव थांबावी, वेळेची व पैशाची बचत व्हावी या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्यात सकाळी ११ पासून वधू - वर नोंदणी, दुपारी १२ पासून परिचय असा कार्यक्रम असून सायंकाळी सहापर्यंत हा मेळावा चालणार आहे.
मेळाव्यासाठी वधू-वर उपस्थित राहणे आवश्यक आहे. नोंदणी फी तीनशे रुपये असून सोबत बायोडाटा व पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आणावेत. समाज बांधवांनी आपल्या उपवर मुलामुलींसह मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा समिती मार्फत करण्यात आले आहे.