सातारकर धावपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवतील : डॉ.संदीप काटे

कॉम्रेड आणि आयर्न मॅन पूर्ण करणाऱ्या सातारच्या धावपटूंचा सातारा हिल रनर्सतर्फे गौरव

by Team Satara Today | published on : 23 June 2025


मेढा : कॉम्रेड आणि आयर्न मॅन स्पर्धा पूर्ण करणाऱ्या धावपटूंनी विशेष कामगिरी करून साताऱ्याचे नाव सातासमुद्रापार उज्वल केले आहे. त्यांचा होत असलेला सन्मान साताऱ्यातील फिटनेस चळवळीला गती देणारा आणि नवोदित धावपटूंना प्रेरणा देणारा ठरेल व पुढील वर्षी यापेक्षा अधिक सातारकर धावपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकं मिळवतील, असा विश्वास सातारा हिल मॅरेथॉनचे संस्थापक डॉ. संदीप काटे व्यक्त केला.

सातारा हिल रनर्सच्या वतीने आयोजित एका विशेष कार्यक्रमात कॉम्रेड आणि आयर्न मॅन सारख्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सातारच्या धावपटूंचा भव्य सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सातारा हिल मॅरेथॉनचे संस्थापक डॉ. संदीप काटे, डॉ. सुचित्रा काटे, जॉइंट रेस डायरेक्टर डॉ दीपक बनकर, डॉ देवदत्त देव, मिलिंद हळबे आदी मान्यवर उपस्थित होते

या प्रेरणादायी कार्यक्रमाची सुरुवात फनी गेम्सने झाली. त्यानंतर धावपटूंना मानाचा फेटा, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि टाळ्यांच्या गजरात गौरवण्यात आले. आयर्न मॅन पूर्ण करणारे यश मुचंडी, तसेच कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण करणारे डॉ संदीप काटे, डॉ सुचित्रा काटे, कृष्णा सोनमळे, सागर निंबाळकर, निरंजन पिसे, अलमास मुलानी, चांगदेव पवार, संतोष कोकरे, डॉ. महेश शिंदे, डॉ. प्रमोद कुचेकर, तसेच मानस आरोग्य तज्ञ डॉ. अजय देशमुख, आहारतज्ज्ञ अमेय भागवत यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. तसेच सातारा रनर वर्कआउट ग्रुपच्या सदस्यांचाही ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. सातत्याने वर्कआउट करणाऱ्या आणि आरोग्यदृष्ट्या प्रेरणा देणाऱ्या या सदस्यांचा गौरव उपस्थित मान्यवरांनी केला. 

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आणि नियोजन सातारा हिल रनर्स व सातारा हिल हाफ मॅरेथॉन चे कोच डॉ. सुधीर पवार व त्यांच्या सर्व सहकारी क्रीडाप्रेमी धावपटूंनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने धावपटू आणि कुटुंबीय उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भविका मुथा आणि भद्रेश शहा यांनी केले. हा कार्यक्रम साताऱ्यातील फिटनेस चळवळीला गती देणारा आणि नवोदित धावपटूंना प्रेरणा देणारा ठरला. भाविका मुथा यांनी आभार मानले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
९९ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाची बुधवारी नियोजन बैठक
पुढील बातमी
अबू आझमी यांच्या प्रतिमेला सातारमध्ये जोडे

संबंधित बातम्या