ऑटोफॅगी मानवी शरीराची एक नॅचरल आणि स्वत:ला वाचवणारी सिस्टीम

मेडिकल विश्वात सतत नवनवीन शोध समोर येत असतात. ज्यात शरीराच्या क्रिया आणि आजारांबाबत आश्चर्यकारक खुलासे केले जातात. सध्या मेडिकल विश्वात 'ऑटोफॅगी'ची चर्चा सुरू आहे. पण अनेकांना ऑटोफॅगी काय आहे हे माहीत नाही. तर ऑटोफॅगी मानवी शरीराची एक नॅचरल आणि स्वत:ला वाचवणारी सिस्टीम आहे. चला तर जाणून घेऊ काय आहे शरीराची ही नॅचरल सिस्टीम आणि कशी काम करते.

ऑटोफॅगी म्हणजे काय?

कोलंबिया यूनिव्हर्सिटीतील न्यूट्रिशन डिपार्टमेंटच्या रिसर्चर्सनुसार, ऑटोफॅगी शरीरातील डॅमेज कोशिका साफ करण्याची एक प्रक्रिया आहे. जेणेकरून नवीन आणि निरोगी कोशिका पुन्हा करता याव्यात. ऑटोफॅगीमध्ये "ऑटो" चा अर्थ स्वत: आणि "फॅगी"चा अर्थ खाणं असा होतो. त्यामुळे ऑटोफॅगीचा शब्दश: अर्थ "स्वत: खाणं" असा होतो. ऑटोफॅगी ही क्रिया आपल्या एकंदर आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.

ऑटोफॅगीनं शरीराला कसा मिळतो फायदा?

एक्सपर्टनुसार, ऑटोफॅगीच्या माध्यमातून शरीर आपल्या निष्क्रिय कोशिकांना साफ करतं आणि त्यांचे भाग इतर कोशिकांच्या रिपेअरिंगसाठी आणि सफाई रिसायकल करतं. ऑटोफॅगीचा उद्देश खराब कोशिका साफ करणं आणि नंतर स्वत:ला चांगल्याप्रकारे कामासाठी तयार करणं आहे.

ही प्रक्रिया शरीरात एकाच वेळी रिसायकलींग आणि सफाई दोन्ही करते. ही शरीराच्या सिस्टीमचं रीसेट बटन दाबण्यासारखी प्रक्रिया आहे. यातून कोशिकांना साफ करणं आणि विषारी पदार्थ बाहेर काढणं, जिवंत राहणं आणि काम करण्याची क्षमता वाढण्याची शरीराची एक पद्धत आहे.

अ‍ॅंटी-एजिंगसोबत इतरही फायदे

ऑटोफॅगीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे अ‍ॅंटी-एजिंग असणं. यानं शरीराचं वाढतं वय कमी करणं आणि नव्या कोशिका तयार करण्याची एक पद्धत आहे. जेव्हा आपल्या कोशिका तणावग्रस्त असतात, तेव्हा आपली रक्षा करण्यासाठी ऑटोफॅगी वाढते, ज्यामुळे आयुष्य वाढण्यास मदत मिळते. कोशिकांमधून टॉक्सिक प्रोटीन हटवणं आणि मोठ्या प्रमाणात नव्या कोशिका तयार केल्यानं कॅन्सर, पार्किंसन्स आणि अल्झायमरसारख्या आजारात मदत मिळते.

उपवासानं ट्रिगर होते ऑटोफॅगी?

जास्त वेळ उपाशी राहिल्यावर किंवा उपवास करत असताना ऑटोफॅगी सेलुलर कंटेन्ट तोडून आणि आवश्यक क्रियांसाठी याचा पुन्हा वापर करून शरीर चालू ठेवते. यासाठी जास्त ऊर्जा लागते आणि हे नेहमीसाठी सुरू राहत नाही. पण यानं आपल्याला पोषण शोधण्यासाठी अधिक वेळ मिळतो.

नियमित उपवास आणि कीटोजेनिक डाएट ऑटोफॅगीला ट्रिगर करते. कीटोसिस डाएट हाय फॅट आणि कार्ब्सला कमी करत असल्यानं उपवासाशिवायही मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यात उपवासासारखाच फायदा मिळतो.

कॅन्सरच्या उपचारात ऑटोफॅगीची भूमिका?

कॅन्सरला रोखणारा उपचार करण्यात ऑटोफॅगीची भूमिकेमुळेच याकडे फार जास्त लक्ष दिलं जात आहे. कारण जसजसं वय वाढतं, शरीरात ऑटोफॅटी कमी होत जाते. म्हणजे ज्या कोशिका आता काम करत नाही किंवा नुकसान पोहोचवू शकतात, त्या अनेक पटीनं वाढतात.

त्याच कॅन्सरच्या कोशिकांचं रूप घेण्याचा धोका असतो. कोणताही कॅन्सर हा कोणत्या ना कोणत्या विषारी कोशिकांपासून सुरू होतो. नेहमीच ऑटोफॅगिक प्रक्रियांचा वापर करून शरीरात त्या कोशिकांची ओळख पटवणं आणि त्यांना दूर करून कॅन्सर रोखला जाऊ शकतो.

मागील बातमी
बीड जिल्ह्यात जमावाच्या हल्ल्यात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
पुढील बातमी
गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलं 'संगीत मानापमान'च्या स्क्रीनिंगचं आयोजन

संबंधित बातम्या