सातारा : नगरपालिका ते पोलीस लाईन जाणाऱ्या रस्त्यावर चोरीची दुचाकी घेऊन जाणाऱ्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमित शंकर चव्हाण (वय २२ रा.वेणेगाव, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.आरोपी पोलीस लाईन रस्त्यावरून यामाहा कंपनीची दुचाकी विना नंबर प्लेट घेऊन जाताना पोलीस कॉन्स्टेबल तुषार भोसले यांना आढळून आला. यावेळी त्याला अडवून गाडीच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता त्याने कागदपत्रे सादर केली नाहीत. तसेच ही मोटरसायकल कुठूनतरी आणली आहे अथवा चोरलेली असल्याचे वाटत असल्याने त्याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोहिते करत आहे.