सातारा : तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शाहरुख नौशाद खान (वय ३१, रा. सोमवार पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षकांनी आरोपीला संपूर्ण सातारा जिल्ह्यातून २० मे २०२५ पासून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते.
मात्र दि. २७ रोजी तो शाहू चौक, नगरपरिषद परिसरात आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत आदेश उल्लंघनाचा गुन्हा नोंदवला. फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सचिन माधव रिटे यांनी दिली असून तपास पोलीस हवालदार यादव करत आहेत.