सातारा : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी १० जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १७ रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील एका महिलेच्या पतीला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी रवींद्र निवृत्ती ढोणे, देवेंद्र उर्फ गोट्या ढोणे, राजेंद्र ढोणे, राहुल घोसळकर, श्रेयस पवार, प्रतीक कोळी, चैतन्य पवार, रुद्र ढोणे, मोन्या कदम, किरण कोळी उर्फ उल्ला (सर्व रा. सातारा) यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मोहोड करीत आहेत.