सातारा : सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सातारा शहर पोलीस ठाण्याच्या समोर असणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर पोलिसांच्या समक्ष सार्वजनिक शांतता बिघडवल्याप्रकरणी मोहम्मद इकबाल फकीर, शबाना मोहम्मद फकीर, निगार रमजान पठाण सर्व रा. कामेरी, ता. सातारा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.