सातारा : परळी ते परळी फाटा जाणाऱ्या रस्त्यावर उरमोडी पुलाच्या बाजूला होंडा शाईन मोटरसायकल चालक धीरज कोंडीबा जाधव(वय २२, रा.ठोसेघर) याने अविचाराने भरधाव, निष्काळजीपणे दुचाकी वेगाने धोकादायक पद्धतीने चालवून समोरून येणाऱ्या दुचाकी चालकास धडक दिली.
या अपघातात रोहिदास श्रीपती भंडारे (वय ४२ रा. लुमनेखोल दहिवडी) हे जखमी झाले आहेत. अपघात कारणीभूत ठरल्याप्रकरणी धीरज कोंडीबा जाधव यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार वायदंडे तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.