सातारा : सातारा एसटी मध्यवर्ती स्थानकाच्या प्रवेश आगमन व निर्गमन व्यवस्थेवर नगराध्यक्ष अमोल मोहिते व आगाराच्या विभाग नियंत्रण ज्योती गायकवाड यांनी चर्चा केली .सेव्हन स्टार परिसरातील वाहतुकीची वाढती कोंडी लक्षात घेऊन सातारा आगार व्यवस्थापनाने निर्गमन प्रवेशद्वार हे नूतनीकरण आराखड्यात उत्तर दिशेला असावे असा आग्रह नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी धरला .मात्र ठरल्या आराखड्याप्रमाणेच कामे होतील, असा सूर विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड यांचा होता .सरते शेवटी नगरपालिका आणि सातारा एसटी आधार यांच्या अभियंत्यांची समन्वयक बैठक मंगळवार दि. 17 रोजी दुपारी बारा वाजता होणार आहे. या बैठकीत धोरणात्मक निर्णय घेऊन त्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारच्या विभागीय नियंत्रक (डीसी)ज्योती गायकवाड यांनी आजनगराध्यक्ष अमोल मोहिते यांची भेट घेतली .त्यानंतर अमोल मोहिते उपनगराध्यक्ष एडवोकेट दत्ता बनकर बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे नगरसेवक राजू गोरे, नगरसेवक सुशांत महाजन मुख्याधिकारी अभिजीत बापट सातारा पालिकेचे नियंत्रण अधिकारी दिलीप चिद्रे यांनी सातारा मध्यवर्ती स्थानकामध्ये सुरू असलेल्या सुविधा आराखड्याची पाहणी केली आणि आराखड्याच्या संदर्भात चर्चा सुद्धा केली .याबाबत बोलताना अमोल मोहिते म्हणाले सातारा आगाराच्या दिवसाला 700 ते 800 बसेस येथे दाखल होतात म्हणजे तासाला 17 ते 18 बसेस यांचे आगमन व निर्गमन होते त्यामुळे प्रवेश करणारे गेट आणि एसटी बस बाहेर पडणारे गेट हे वेगवेगळे असावे अशी सूचना मांडण्यात आली .तसेच आराखड्यातील इतर सुद्धा कामांची यावेळी पाहणी करण्यात आली. विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी सुद्धा आराखड्याप्रमाणेच कामे होतील असा आग्रह धरला होता. वाहतूक व्यवस्थापन आणि सातारा शहरातील वाढती कोंडी यावर योग्य तो मार्ग काढण्यासाठी दोन्ही विभागाचे अभियंता एकत्र बसून चर्चा करतील आणि तसेच आराखडा अंतिम होताना खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सुद्धा मार्गदर्शन घेतले जाईल असा निर्णय घेण्यात आला.
विशेषतः एसटीच्या ‘इन’ व ‘आऊट’ गेटमध्ये आवश्यक बदल करून वाहतूक सुरळीत करण्याबाबत समन्वयक उपाययोजना केल्या जाणे गरजेचे आहे अशी बाजू सातारा नगरपालिकेने मांडली आहे. सेवन स्टार परिसरात वाहतुकीची कोंडी कमी व्हावी या दृष्टीने एसटीच्याआगमन अथवा निर्गमन गेट वेगळ्या दिशेला असावे अशी भूमिका मांडण्यात आली. जेणेकरून प्रवासी व नागरिकांना अधिक सुविधा मिळतीलआणि वाहतूक कोंडी कमी होईल या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी दिले आहेत.