सातारा : कोळेगाव, ता. कराड येथे सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि कराड तालुका यांच्या संयुक्त सहकार्याने घरफोडीमधील दोन अट्टल गुन्हेगार यांना जेरबंद करण्यात आले. त्यांच्याकडून दहा घरफोडीचे गुन्हे उघड करण्यात आले असून आठ लाख 86 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गणेश दिलीप जाधव (रा. उंब्रज तालुका कराड) व अमोल लालासो शेळके (रा. ढेबेवाडी, ता. पाटण ) असे ताब्यात घेतलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत .प्राथमिक चौकशीमध्ये त्यांच्याकडून चार तोळे सहा ग्रॅम सोन्याचे दागिने सात लाख छत्तीस हजार रुपये किमतीचे सत्तर ग्रॅम चांदीचे दागिने, टारसायकल पंचावन्न हजार रुपये रोख आणि शेतीपंप असा आठ लाख ८,८६,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
त्यानुसार रेठरे बुद्रुक येथे एका घरामध्ये हॉटेलमध्ये चोरी केलेले आरोपी कोळेगाव येथे एका बारमध्ये येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे रोहित फार्मे विश्वास शिंगाडे परितोष दातीर तसेच कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप सहायक पोलीस निरीक्षक संभाजी यांच्या पथकाने बारच्या परिसरात सापळा रचला आणि संशयावरून तेथील दोघाजणांना हटकले. पोलिसांनी त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता उडवा उडवी ची उत्तरे देऊन तेथून पळून जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना पकडून ताब्यात घेतले.
कराड शहर कराड तालुका मसूर कोयनानगर पाटण या पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहा घरफोडीचे गुन्हे केल्याचे त्यांनी कबूल केले. गुन्हे शाखेने कराड तालुका पोलिसांच्या ताब्यात त्यांना दिले आहे. या कारवाईमध्ये मंगेश महाडिक, अजित करणे, अमोल माने, राकेश खांडके, मुनीर मुल्ला, अमित झेंडे, अजय जाधव, हसन तडवी, शिवाजी भिसे, प्रवीण पवार, स्वप्निल दौंड, विजय निकम, संभाजी साळुंखे, शकुंतला सनस, दत्तात्रय तायशेटे यांनी भाग घेतला होता.