अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी खाद्यपदार्थ, इतर साहित्य गाळे नोंदणी सुरु

by Team Satara Today | published on : 25 November 2025


पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साता-यात दि. १ जानेवारी ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान होणार आहे. संमेलनासाठी खाद्य पदार्थ व इतर साहित्याचे गाळा नोंदणी सुरु झाल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनिताराजे पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

पत्रकात, साता-यात तब्बल ३२ वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. हे संमेलन वैशिष्टयपूर्ण आणि साता-याच्या लौकिकाला साजेसे होण्यासाठी संयोजक प्रयत्नशील आहेत. या संमेलनासाठी खाद्य पदार्थ व इतर साहित्यासाठी गाळा नोंदणी सुरु झाली आहे.  इच्छुकांनी ऑनलाईन नोंदणी करावी.


संमेलनात एकूण गाळ्यांची संख्या  असेल. गाळ्याचा आकार ९ बाय ९ फूट असा आहे. गाळ्यामध्ये २ टेबल, २ खुर्च्या, दोन विजेचे दिवे, एक पॉवर कनेक्शन असेल.  खाद्यपदार्थ गाळेधारकांनी गाळ्याची स्वच्छता तसेच लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था स्वत:च करायची आहे.  गाळ्यातील सर्व साहित्याची, सामग्रीची सुरक्षा, जबाबदारी, विमा या गोष्टी गाळाधारकांनी करावयाच्या आहेत. आयोजन समिती त्यास जबाबदार असणार नाही. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य राहिल. गाळ्याचे वाटप ड्रॉ पध्दतीने होणार आहे. एका संस्थेला, व्यक्तीला कमाल चार गाळे  नोंदणी करता येईल. लागणारे शुल्क बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या कोणत्याही शाखेत रोख अथवा ऑनलाईन पध्दतीने (खात्याचे नाव :- मावळा फौंडेशन, बँकेचे नाव व शाखा बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा सातारा शहर, खाते क्रमांक ६०५३७९६२१०९ आय.एफ.एसी. कोड एम.ए.एच.बी.००००१३४) येथे भरायचे आहे. त्यासाठी महेंद्र पुराणिक, संजय काटकर, उमेश साठे, आकाश शेटे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी केले आहे.      

अधिक माहितीसाठी सातारा येथील ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच ग्रंथ गाळे समितीच्या प्रमुख सुनिताराजे पवार, प्रतिभा विश्वास, कुंडलिक अतकरे, गजानन नारे हे असून चंद्रकांत सणस हे मुख्य समन्वयक तर विद्या पोळ, योगेश शिंदे समन्वयक तर  ऋषिकेश सारडा सहसमन्वयक आहेत. समितीत भूषण क्षीरसागर, अजिज पटेल, अक्रम बागवान या सदस्यांचा समावेश आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दोन्ही महाराजांसह भाजप नेत्यांचे फोटो वापराल तर खबरदार - आ. डॉ. अतुल भोसले; आढळल्यास कारवाई करण्याचा दिला इशारा
पुढील बातमी
उरमोडी धरण परिसरात दोन दुचाकींची समोरासमोर धडक

संबंधित बातम्या