सातारा : अल्पवयीनावर चाकूने वार करून त्याला जखमी केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 25 रोजी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास मनामती चौक, ढोणे कॉलनी, सातारा येथे एका अल्पवयीन मुलावर जुन्या भांडणाच्या कारणातून चाकूने वार करून जखमी केल्याप्रकरणी तसेच त्याच्या मित्राला मारहाण केल्याप्रकरणी प्रकाश रामचंद्र कोकरे (रा. पळसवडे, पोस्ट बनगर ता. सातारा) व इतर दोन अनोळखी इसमांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.