सातारा : सासूला जखमी केल्याप्रकरणी सुनेविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, घरगुती कारणातून चिडून जावून सुनेने सासूला ढकलल्यानंतर त्यांचे फ्रॅक्चर होवून जखमी झाल्या. याप्रकरणी पार्वती किसन साबळे (वय 90, रा. वडूथ ता.सातारा) यांनी निकीता संजय साबळे (वय 46. रा. वडूथ) यांच्या विरुध्द तक्रार दिली आहे. ही घटना दि. 23 ऑगस्ट रोजी वडूथ येथे घडली आहे. यावेळी सुनेने शिवीगाळ, दमदाटी केली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार बोराटे करीत आहेत.