सातारा : दि.१ ऑक्टोंबर या जागतिक जेष्ठ नागरीक दिनाचे औचित्य साधून सातारा जिल्हा पोलीस दलाचे वतीने ज्येष्ठ नागरिकांसोबत साजरा करण्यात आला. यावेळी भरोसा सेल सातारा येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी जेष्ठ नागरीकांना जेष्ठ नागरीक कायदा २००७ मधील तरतुदीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
आर.सी.पी.हॉल पोलीस मुख्यालय सातारा येथे अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिक दिन साजरा झाला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करुन जिल्हा पोलीस दलाचा हा अभिनव उपक्रम असल्याचे सांगून, जेष्ठ नागरीकांना याचा मोठा आधार असल्याचे मत व्यक्त केले आहे.