जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

by Team Satara Today | published on : 02 October 2025


सातारा   : जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका सदस्य आरक्षण निश्चिती व सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. 

सदर कार्यक्रम खालीलप्रमाणे. - अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता जागा निश्चित करण्यासाठी विहित नमुन्यातील प्रस्ताव तयार करुन विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करणे ६ ऑक्टोबर पर्यंत., अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता राखीव जागांच्या प्रस्तावास मान्यता देणे दि. ८ ऑक्टोबर पर्यंत., आरक्षण सोडतीची सूचना वृत्तपत्रात प्रसिध्द करणे दि. १० ऑक्टोबर., जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी व पंचायत समिती निर्वाचक गणासाठी आरक्षणाची सोडत काढणे १३ ऑक्टोबर., प्रारुप आरक्षणाची अधिसूचना प्रसिध्द करणे १४ ऑक्टोबर. जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील प्रारुप आरक्षणावर हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी 14 ते 17 ऑक्टोबर पर्यंत.

प्राप्त प्रारुप आरक्षणावरील हरकती व सूचना आधारे अभिप्रायासह गोषवारा विभागीय आयुक्त यांना सादर करणे 27 ऑक्टोबरपर्यंत., प्रारूप आरक्षणावर प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करुन आरक्षण अंतिम करणे 31 ऑक्टोबरपर्यंत व अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिध्द करणे 3 नोव्हेंबर 2025 पर्यंत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दसऱ्यानिमित्ताने सातारा शहरातील वाहतुकीमध्ये बदल; सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव यांची माहिती
पुढील बातमी
दसऱ्यानिमित्त शाहुपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील ५१ उपद्रवींवर मनाई आदेश

संबंधित बातम्या