गैरसमज पसरवणाऱ्या पोस्टपासून सावधान, अंतिम निर्णय माझे नेते खा. उदयनराजे भोसले घेतील : संग्राम बर्गे

by Team Satara Today | published on : 12 October 2025


सातारा, दि. ११ : मी फक्त आणी फक्त माझ्या कुवतीप्रमाणे नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहे. या आणि अशा खोट्यापोस्ट विरोधात सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणार, अशी भूमिका संग्राम बर्गे  यांनी मांडली  आहे. 

लवकरच सातारा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत..या होत असताना लोकशाहीमध्ये आपली भूमिका मांडण्याचा इच्छा व्यक्त करण्याच्या अधिकार आहे. मी देखील या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवण्यासाठो इच्छुक आहे..परंतु अंतिम निर्णय माझे नेते खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आहे. परंतु, डिजिटल युगात चुकीच्या पद्धतीने बदल करून मुद्दाम माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न आहे. या पोस्ट च्या माध्यमातून मी सांगू इच्छितो मला माझी राजकीय सामाजिक कुवत कुठपर्यंत आहे याची जाणीव आहे. मी नगरपालिका सोडून कोणत्याही ठिकाणी माझी आणि माझ्या सहकारी मित्राची जाण्याची इच्छा नाही. 

अशा पोस्ट पासून सावधान  : माझी सर्वांना विनंती आहे अशी पोस्ट निदर्शनास आल्यास तत्काळ मला पाठवावी आणि ज्या व्हॉट्सअप ग्रुप वर येईल त्याचे नाव पाठवावे., असे आवाहन संग्राम बर्गे यांनी केले आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सासपडे येथील शाळकरी मुलीचा खूनच; संशयितांच्या घरावर हल्लाबोल; गावात तणावाचे वातावरण
पुढील बातमी
जुगारप्रकरणी सातारा शहरासह तालुक्यातील चारजणांवर कारवाई

संबंधित बातम्या