सातारा : अवैधरित्या दारू विक्री केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 रोजी संध्याकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास पानमळेवाडी, ता. सातारा येथील कण्हेर डाव्या कालव्याच्या आडोशाला तेथीलच विलास अण्णा कोळे हा अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून आठशे रुपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.