ताणतणाव व्यवस्थापन आणि सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम

by Team Satara Today | published on : 14 October 2025


सातारा : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांचे संयुक्त विद्यमाने 'जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त' ताण तणाव व्यवस्थापन आणि सायबर सुरक्षा या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष श्री.ए.एस. वाघमारे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

सातारा येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमास सातारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव निना. नि. बेदरकर, आंतरराष्ट्रीय योगाचे समुपदेशक तज्ञ डॉ. धनश्री पाटील,  सायबर पोलीस हवालदार अतुला तावरे व वर्षा खोचे यांनी मार्गदर्शन केले.

डॉ. धनश्री पाटील यांनी दैनंदिन कामातून येणा-या ताणाचे योग्य व्यवस्थापन कसे करायचे, शारिरीक आणि मानसिक आरोग्य चांगले कसे राखावे आणि शारिरीक, मानसिक आरोग्य आणि रोजचे दैनंदिन कामकाज यामध्ये समतोल कसे साधावे या विषयावर बहुमूल्य मार्गदर्शन केले. सायबर पोलीस हवालदार अतुला तावरे आणि वर्षा खोचे यांनी ऑनलाईन फ्रॉड, डिजीटल फसवणूक, डिजीटल अरेस्ट, अशा अनेक सायबर सुरक्षेविषयी येणा-या अडचणींबाबत सखोल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड, सुचिता पाटील, सहाय्यक विधी सहाय्य बचाव सल्लागार यांनी केले.  कार्यक्रमास जिल्हा न्यायालय, सातारा येथील कार्यरत महिला कर्मचारी उपस्थित होत्या.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्वागत समिती सदस्यपदी क्षमा जोशी, किरण साबळे
पुढील बातमी
४८ तासांत रेल्वेतून होणाऱ्या 'सोनेरी वाहतुकीच्या' दोन घटना उजेडात

संबंधित बातम्या